Primary, Savoiverem Marathi : About Us

आमच्या विषयी

गोवा विद्याप्रसारक मंडळाचा प्राथमिक विभाग (मराठी माध्यम ) वळवई, सावईवेरे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयाबरोबरच क्रिडास्पर्धा, स्पर्धा परीक्षा, कथाकथन स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, यासारख्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेतले जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला संधी दिली जाते. विविध उपक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला

सहभागी करुन घेतले जाते तसेच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गौरविले जाते.

 

इतिहास

गोवा विद्याप्रसारक मंडळाचा प्राथमिक विभाग (मराठी माध्यम ) वळवई, सावईवेरे येथे सन २०१३मध्ये २२विद्यार्थी, १ शिक्षिका, १ शिक्षकेतर कर्मचारी घेऊन सुरू केला गेला.

 

विभागप्रमूखाचा संदेश

विभागप्रमूखाचा संदेश

गोवा विद्याप्रसारक मंडळाचा प्राथमिक विभागाची (मराठी माध्यम ) इमारत वळवई, सावईवेरे या स्वयंसिध्द गावामधील हिरव्यागार परिसरामध्ये उभारली आहे. आमची शाळा जरी छोट्याश्या गावामध्ये असली तरी शहरातील शाळेप्रमाणेच सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या जातात.

आमच्या विद्यार्थ्यांमध्ये शहरातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे. आमचे विद्यार्थी शैक्षणिक विषयाबरोबरच क्रिडास्पर्धा तसेच इतर उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात व तालुकास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवर यशस्वी  देखील होतात.

मी आशा करते की, आमच्या शाळेच्या  यशाचा आलेख येणार्‍या वर्षांमध्ये सदैव वाढता व यशाकडे जाणारा असो.

Calendar of Events

<<Dec 2019>>
MTWTFSS
25 26 27 28 29 30 1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28 29
30 31 1 2 3 4 5

Upcoming Events

  • No events