गोवा विद्याप्रसारक मंडळाचे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय मराठी माध्यम फोंडा गोवा: आमची ओळख

 

आमची ओळख

गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात आम्ही शिक्षिका मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे नेहमी लक्ष देतो. शालेय अभ्यासक्रमाबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवून व स्पर्धा घेऊन आम्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो तसेच वेगवेगळया स्पर्धा घेऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो जेणेकरुन आमची मुले भविष्यात कोणत्याही क्षेत्रात मागे पडणार नाहीत.

 

शाळेचा इतिहास

गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय १९७५ मध्ये सुरु झाले. नंतर १९९० मध्ये या विद्यालयाचे दोन विभाग करण्यात आले. त्या सालापासून आमच्या शाळेचे माध्यम मराठी झाले. सध्या शाळेत शिशुवाटिका ते इयत्ता चौथीपर्यंत वर्ग घेतले जातात. शाळेत एकुण ४२८ विद्यार्थी,१२ शिक्षिका, एक कारकून व २ मदतनीस आहेत. शाळेच्या सर्व शिक्षिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असतात तसेच सर्व मदतनीस शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपले योगदान देतात.

विभागप्रमुखांचा संदेश

गोवा विद्याप्रसारक मंडळाचे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय हे फोंडा येथील जुने बसस्थानक व मंडळाचे पहिले विद्यालय म्हणजेच आंतोनियो जुझे दी आल्मेद हायस्कूल यांच्या मध्यभागी सुंदर व निसर्गरम्य वातावरणात उभे आहे. मराठी माध्यमाची शाळा असूनसुध्दा आमचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आमचे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने कोणत्याही स्पर्धेत आपले वर्चस्व दाखवितात. अभिमानाची गोष्ट म्हणजे मुंबई येथील रंगोत्सव या संस्थेने सतत दोन वर्षे आमच्या शाळेची प्रज्ञावंत शाळा म्हणून निवड केली आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी तालुका व राज्य पातळीवर क्रीडा, चित्रकला, श्लोकपठण, गीतगायन, कथाकथन, हस्ताक्षर, अबेकस सारख्या स्पर्धांत यश संपादन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर सतत दोन वर्षे ह्स्ताक्षर, चित्रकला या स्पर्धांतून बक्षीसे पटकावली आहेत.माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात असेच यश संपादन करुन आपले व शाळेचे नाव उज्वल करावे यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.

Calendar of Events

<<Sep 2018>>
MTWTFSS
27 28 29 30 31 1 2
3 4 5 6 7 8 9
10 11 12 13 14 15 16
17 18 19 20 21 22 23
24 25 26 27 28 29 30

Upcoming Events

  • No events