‘अक्षरमंच’ मासिकाचे अनावरण २०२२

गोवा विद्याप्रसारक मंडळ डॉ. दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयात २ मार्च २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अक्षरमंच’ या मराठी मासिकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभागाचे माजी विद्यार्थी श्री. गोपीनाथ गावस उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांपासून मराठी विभाग हे मासिक प्रकाशित करत आहे. नवोदित विद्यार्थी कलाकारांच्या कलेला योग्य व्यासपीठ प्राप्त व्हावे या हेतूने या मासिकाचे प्रकाशन करण्यात येते. या मासिकात विद्यार्थ्यांचे लेख, कविता, चित्रे, कथा इत्यादि साहित्य प्रकाशित केले जाते. यंदा शिक्षक समीर नाईक यांनी संपादक तर कु. निलेश मापारी आणि कु. निकिता आईर यांनी उपसंपादकाची भुमिका बजावली. प्रा. जोजेन मॅथ्यू यांनी या प्रसंगी उत्तम साहित्य निर्मीती केलेल्या आणि मासिक संपादन आणि प्रकाशनाच्या कार्यात हातभार लावलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे श्री. गोपीनाथ गावस यांनी देखील या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सातत्याने साहित्य निर्मिती करावी असे आव्हान केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कु. दिव्या सावंत हिने केलेल्या आभार-प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कु. संतोषी वायंगणकर हिने सूत्रसंचालन केले.